PDFSource

गुरुचरित्र अध्याय 14 वा मराठी | Gurucharitra Adhyay 14 PDF in Marathi

गुरुचरित्र अध्याय 14 वा मराठी | Gurucharitra Adhyay 14 Marathi PDF Download

गुरुचरित्र अध्याय 14 वा मराठी | Gurucharitra Adhyay 14 Marathi PDF Download for free using the direct download link given at the bottom of this article.

गुरुचरित्र अध्याय 14 वा मराठी | Gurucharitra Adhyay 14 PDF Details
गुरुचरित्र अध्याय 14 वा मराठी | Gurucharitra Adhyay 14
PDF Name गुरुचरित्र अध्याय 14 वा मराठी | Gurucharitra Adhyay 14 PDF
No. of Pages 10
PDF Size 0.60 MB
Language Marathi
CategoryEnglish
Source pdffile.co.in
Download LinkAvailable ✔
Downloads17
If गुरुचरित्र अध्याय 14 वा मराठी | Gurucharitra Adhyay 14 is a illigal, abusive or copyright material Report a Violation. We will not be providing its PDF or any source for downloading at any cost.

गुरुचरित्र अध्याय 14 वा मराठी | Gurucharitra Adhyay 14 Marathi

नमस्कार मित्रांनो, या पोस्टद्वारे आम्ही तुम्हाला गुरुचरित्र अध्याय 14 वा मराठी PDF / Gurucharitra Adhyay 14 PDF in Marathi डाउनलोड करण्यासाठी हिंदीमध्ये डाउनलोड लिंक देत आहोत. गुरु चरित्र १४ वा अध्याय मराठीत अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. श्री गुरु चरित्र हे श्री नरसिंह सरस्वती यांच्या जीवनावर आधारित आणि प्रेरित आहे. गुरुचरित्र अध्याय मराठी PDF मध्ये श्री नरसिंह सरस्वती यांच्याशी संबंधित विविध मौल्यवान तत्वज्ञान आणि कथा आहेत.

ते दत्तात्रेय परंपरेचे (संप्रदाय) भारतीय गुरु होते. श्रीपाद श्रीवल्लभ यांच्यानंतर कलियुगातील दत्तात्रेयांचा श्री नरसिंह सरस्वती हा दुसरा अवतार आहे. जर तुम्ही गुरुचरित्र अध्याय 14 गीत PDF शोधत असाल, तर तुम्हाला ते येथे मिळेल. हे महाराष्ट्रामध्ये इतके लोकप्रिय आहे की लोक मराठी ऑडिओमध्ये गुरुचरित्र 14 अध्याय देखील ऐकतात आणि गुरुचरित्र अध्याय 14 पुस्तक वाचतात. जर तुम्हाला गुरुचरित्र अध्याय 14 मराठी अर्थ समजून घ्यायचा असेल तर तुम्ही ते स्वतः वाचावे. असे बरेच लोक आहेत ज्यांना या शास्त्राचे महत्त्व माहित आहे आणि त्यांनी गुरुचरित्र अध्याय 14 चे फायदे अनुभवले आहेत.

गुरुचरित्र अध्याय 14 वा मराठी PDF | Gurucharitra Adhyay 14 PDF in Marathi

श्री गणेशाय नमः I श्रीसरस्वत्यै नमः I श्रीगुरुभ्यो नमः I

 

नामधारक शिष्य देखा I विनवी सिद्धासी कवतुका I

प्रश्न करी अतिविशेखा I एकचित्ते परियेसा II १ II

 

जय जया योगीश्वरा I सिद्धमूर्ति ज्ञानसागरा I

पुढील चरित्र विस्तारा I ज्ञान होय आम्हांसी II २ II

 

उदरव्यथेच्या ब्राह्मणासी I प्रसन्न जाहले कृपेसी I

पुढे कथा वर्तली कैसी I विस्तारावे आम्हांप्रति II ३ II

 

ऐकोनि शिष्याचे वचन I संतोष करी सिद्ध आपण I

गुरुचरित्र कामधेनु जाण I सांगता जाहला विस्तारे II ४ II

 

ऐक शिष्या शिखामणि I भिक्षा केली ज्याचे भुवनी I

तयावरी संतोषोनि I प्रसन्न जाहले परियेसा II ५ II

 

गुरुभक्तीचा प्रकारु I पूर्ण जाणे तो द्विजवरू I

पूजा केली विचित्रु I म्हणोनि आनंद परियेसा II ६ II

 

तया सायंदेव द्विजासी I श्रीगुरू बोलती संतोषी I

भक्त हो रे वंशोवंशी I माझी प्रीति तुजवरी II ७ II

 

ऐकोनि श्रीगुरुचे वचन I सायंदेव विप्र करी नमन I

माथा ठेवून चरणी I न्यासिता झाला पुनःपुन्हा II ८ II

 

जय जया जगद्गुरू I त्रयमूर्तींचा अवतारू I

अविद्यामाया दिससी नरु I वेदां अगोचर तुझी महिमा II ९ II

 

विश्वव्यापक तूंचि होसी I ब्रह्मा-विष्णु-व्योमकेशी I

धरिला वेष तूं मानुषी I भक्तजन तारावया II १० II

 

तुझी महिमा वर्णावयासी I शक्ति कैंची आम्हांसी I

मागेन एक आता तुम्हांसी I तें कृपा करणे गुरुमूर्ति II ११ II

 

माझे वंशपारंपरी I भक्ति द्यावी निर्धारी I

इहे सौख्य पुत्रपौत्री I उपरी द्यावी सद्गति II १२ II

 

ऐसी विनंति करुनी I पुनरपि विनवी करुणावचनी I

सेवा करितो द्वारयवनी I महाशूरक्रुर असे II १३ II

 

प्रतिसंवत्सरी ब्राह्मणासी I घात करितो जीवेसी I

याचि कारणे आम्हांसी I बोलावीतसे मज आजि II १४ II

 

जातां तया जवळी आपण I निश्चये घेईल माझा प्राण I

भेटी जाहली तुमचे चरण I मरण कैचे आपणासी II १५ II

 

संतोषोनि श्रीगुरूमूर्ति I अभयंकर आपुले हाती I

विप्रमस्तकी ठेविती I चिंता न करी म्हणोनिया II १६ II

 

भय सांडूनि तुवां जावे I क्रुर यवना भेटावे I

संतोषोनि प्रियभावे I पुनरपि पाठवील आम्हांपाशी II १७ II

 

जंववरी तू परतोनि येसी I असो आम्ही भरंवसी I

तुवां आलिया संतोषी I जाऊ आम्हीं येथोनि II १८ II

 

निजभक्त आमुचा तू होसी I पारंपर-वंशोवंशी I

अखिलाभीष्ट तू पावसी I वाढेल संतति तुझी बहुत II १९ II

 

तुझे वंशपारंपरी I सुखे नांदती पुत्रपौत्री I

अखंड लक्ष्मी तयां घरी I निरोगी होती शतायुषी II २० II

 

ऐसा वर लाधोन I निघे सायंदेव ब्राह्मण I

जेथे होता तो यवन I गेला त्वरित तयाजवळी II २१ II

 

कालांतक यम जैसा I यवन दुष्ट परियेसा I

ब्राह्मणाते पाहतां कैसा I ज्वालारूप होता जाहला II २२ II

 

विमुख होऊनि गृहांत I गेला यवन कोपत I

विप्र जाहला भयचकित I मनीं श्रीगुरूसी ध्यातसे II २३ II

 

कोप आलिया ओळंबयासी I केवी स्पर्शे अग्नीसी I

श्रीगुरूकृपा होय ज्यासी I काय करील क्रुर दुष्ट II २४ II

 

गरुडाचिया पिलीयांसी I सर्प तो कवणेपरी ग्रासी I

तैसे तया ब्राह्मणासी I असे कृपा श्रीगुरुची II २५ II

 

कां एखादे सिंहासी I ऐरावत केवीं ग्रासी I

श्रीगुरुकृपा होय ज्यासी I कलिकाळाचे भय नाही II २६ II

 

ज्याचे हृदयीं श्रीगुरुस्मरण I त्यासी कैंचे भय दारुण I

काळमृत्यु न बाधे जाण I अपमृत्यु काय करी II २७ II

 

ज्यासि नांही मृत्यूचे भय I त्यासी यवन असे तो काय I

श्रीगुरुकृपा ज्यासी होय I यमाचे मुख्य भय नाही II २८ II

 

ऐसेपरी तो यवन I अन्तःपुरांत जाऊन I

सुषुप्ति केली भ्रमित होऊन I शरीरस्मरण त्यासी नाही II २९ II

 

हृदयज्वाळा होय त्यासी I जागृत होवोनि परियेसी I

प्राणांतक व्यथेसी I कष्टतसे तये वेळी II ३० II

 

स्मरण असे नसे कांही I म्हणे शस्त्रे मारितो घाई I

छेदन करितो अवेव पाही I विप्र एक आपणासी II ३१ II

 

स्मरण जाहले तये वेळी I धांवत गेला ब्राह्मणाजवळी I

लोळतसे चरणकमळी I म्हणे स्वामी तूंचि माझा II ३२ II

 

येथे पाचारिले कवणी I जावे त्वरित परतोनि I

वस्त्रे भूषणे देवोनि I निरोप दे तो तये वेळी II ३३ II

 

संतोषोनि द्विजवर I आला ग्रामा वेगवत्र I

गंगातीरी असे वासर I श्रीगुरुचे चरणदर्शना II ३४ II

 

देखोनिया श्रीगुरूसी I नमन करी तो भावेसी I

स्तोत्र करी बहुवसी I सांगे वृत्तांत आद्यंत II ३५ II

 

संतोषोनि श्रीगुरूमूर्ति I तया द्विजा आश्वासिती I

दक्षिण देशा जाऊ म्हणती I स्थान-स्थान तीर्थयात्रे II ३६ II

 

ऐकोनि श्रीगुरुंचे वचन I विनवीतसे कर जोडून I

न विसंबे आतां तुमचे चरण I आपण येईन समागमे II ३७ II

 

तुमचे चरणाविणे देखा I राहो न शके क्षण एका I

संसारसागर तारका I तूंचि देखा कृपासिंधु II ३८ II

 

उद्धरावया सगरांसी I गंगा आणिली भूमीसी I

तैसे स्वामी आम्हासी I दर्शन दिधले आपुले II ३९ II

 

भक्तवत्सल तुझी ख्याति I आम्हा सोडणे काय नीति I

सवे येऊ निश्चिती I म्हणोनि चरणी लागला II ४० II

 

येणेपरी श्रीगुरूसी I विनवी विप्र भावेसी I

संतोषोनि विनयेसी I श्रीगुरू म्हणती तये वेळी II ४१ II

 

कारण असे आम्हा जाणे I तीर्थे असती दक्षिणे I

पुनरपि तुम्हां दर्शन देणे I संवत्सरी पंचदशी II ४२ II

 

आम्ही तुमचे गांवासमीपत I वास करू हे निश्चित I

कलत्र पुत्र इष्ट भ्रात I मिळोनी भेटा तुम्ही आम्हां II ४३ II

 

न करा चिंता असाल सुखे I सकळ अरिष्टे गेली दुःखे I

म्हणोनि हस्त ठेविती मस्तके I भाक देती तये वेळी II ४४ II

 

ऐसेपरी संतोषोनि I श्रीगुरू निघाले तेथोनि I

जेथे असे आरोग्यभवानी I वैजनाथ महाक्षेत्र II ४५ II

 

समस्त शिष्यांसमवेत I श्रीगुरू आले तीर्थे पहात I

प्रख्यात असे वैजनाथ I तेथे राहिले गुप्तरूपे II ४६ II

 

नामधारक विनवी सिद्धासी I काय कारण गुप्त व्हावयासी I

होते शिष्य बहुवसी I त्यांसी कोठे ठेविले II ४७ II

 

गंगाधराचा नंदनु I सांगे गुरुचरित्र कामधेनु I

सिद्धमुनि विस्तारून I सांगे नामकरणीस II ४८ II

 

पुढील कथेचा विस्तारू I सांगता विचित्र अपारु I

मन करूनि एकाग्रु I ऐका श्रोते सकळिक हो II ४९ II

इति श्रीगुरूचरित्रामृते परमकथाकल्पतरौ श्रीनृसिंहसरस्वत्युपाख्याने सिद्ध-नामधारकसंवादे क्रुरयवनशासनं-सायंदेववरप्रदानं नाम चतुर्दशोSध्यायः II श्रीगुरूदत्तात्रेयार्पणमस्तु II श्रीगुरुदेवदत्त II

You may also like:

Sunderkand Marathi 

कनकधारा स्तोत्रम् मराठी | Kanakadhara Stotram Marathi

कालभैरवाष्टक PDF | Kalabhairava Ashtakam

शिव तांडव स्तोत्र मराठी | Shiv Tandav Stotram Marathi

साई सच्चरित्र | Sai Satcharitra Marathi

शिवाजी महाराज निबंध मराठी | Shivaji Maharaj Essay Marathi

खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून तुम्ही गुरुचरित्र अध्याय 14 वा मराठी PDF / Gurucharitra Adhyay 14 PDF मोफत डाउनलोड करू शकता.


गुरुचरित्र अध्याय 14 वा मराठी | Gurucharitra Adhyay 14 PDF Download Link

Report This
If the download link of Gujarat Manav Garima Yojana List 2022 PDF is not working or you feel any other problem with it, please Leave a Comment / Feedback. If गुरुचरित्र अध्याय 14 वा मराठी | Gurucharitra Adhyay 14 is a illigal, abusive or copyright material Report a Violation. We will not be providing its PDF or any source for downloading at any cost.

Leave a Reply

Your email address will not be published.