PDFSource

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निबंध मराठी PDF

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निबंध मराठी PDF Download

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निबंध मराठी PDF Download for free using the direct download link given at the bottom of this article.

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निबंध मराठी PDF Details
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निबंध मराठी
PDF Name स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निबंध मराठी PDF
No. of Pages 4
PDF Size 0.76 MB
Language English
Categoryमराठी | Marathi
Source pdffile.co.in
Download LinkAvailable ✔
Downloads678
If स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निबंध मराठी is a illigal, abusive or copyright material Report a Violation. We will not be providing its PDF or any source for downloading at any cost.

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निबंध मराठी

नमस्कार मित्रांनो, आज या लेखाद्वारे आम्ही तुम्हा सर्वांसाठी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निबंध मराठी PDF देणार आहोत. जसे आपणा सर्वांना माहित आहे की स्वातंत्र्य दिन हा सर्व भारतीय लोकांसाठी सर्वात महत्वाचा दिवस आहे. दरवर्षी 15 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिन साजरा केला जातो. 1947 मध्ये 15 ऑगस्ट रोजी भारताला ब्रिटिश राजवटीपासून स्वातंत्र्य मिळाले.

त्यामुळे स्वातंत्र्य दिन हा भारताचा राष्ट्रीय सण मानला जातो. या वर्षी १५ ऑगस्ट २०२२ रोजी देशाच्या स्वातंत्र्याला ७६ वर्षे पूर्ण होत आहेत. 12 मार्च 2021 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 1930 मध्ये या दिवशी दांडीयात्रेची सुरुवात केली होती. हा सण 75 वर्षांपूर्वी देशाला स्वतंत्र करण्यात महत्त्वाची साथ देणाऱ्या महान लोकांच्या स्मरणार्थ साजरा केला जातो.

आझादी का अमृत महोत्सवाच्या शुभारंभाच्या निमित्ताने – भारताच्या स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्धापन दिनाला समर्पित 75 आठवड्यांचा कार्यक्रम. भारताच्या स्वातंत्र्याच्या आनंदात, भारत सरकारकडून अनेक प्रकारचे राष्ट्रीय कार्यक्रम आयोजित केले जातात, त्यापैकी एक “आझादी का अमृत महोत्सव” असे म्हणतात. त्यामुळे दरवर्षीप्रमाणे यंदाही हा उत्सव मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात येणार आहे.

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निबंध मराठी PDF / Swatantryacha Amrut Mahotsav Nibandh in Marathi

एकच तारा समोर, आणिक पायतळी अंगार, 

गर्जा जयजयकार क्रांतीचा गर्जा जयजयकार 

कवी कुसुमाग्रज यांनी केलेल्या या आवाहनाचे सार्थक होण्यास 15 ऑगस्ट 1947 चा दिवस उजाडला पक्षी पक्षी पिंजऱ्यातून उडाला. स्वातंत्र्याची रम्या प्रभात झाली. असंख्य बलिदानांचे सार्थक झाले आणि भारताला पारतंत्र्यातून मुक्तता मिळून स्वातंत्र्य मिळाले.

आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी ज्या महान नेत्यांनी क्रांतिवीरांनी आपल्या प्राणाचे बलिदान दिले अशा सर्वांना वंदन करून मी माझ्या निबंधाला सुरुवात करत आहे . मित्रांनो ” भा ” या शब्दाचा अर्थ तुम्हाला माहित आहे का ? ” भा ” म्हणजे तेज आणि ” रत ” म्हणजे रममाण झालेला . तेजात रममाण झालेला देश म्हणजे भारत देश होय . आपल्या भारत देशामध्ये सर्व जाती-धर्माचे लोक एकजुटीने राहतात . त्यामुळे आपला देश सर्वधर्मसमभाव असलेला देश म्हणून ओळखला जातो .

भारत माझा देश आहे आणि सारे भारतीय माझे बांधव आहेत अशा प्रतिज्ञा आपण अभिमानाने आणि गर्वाने करतो . ही प्रतिज्ञा आपण आज म्हणू शकतो कारण आपल्या महान नेत्यांनी ,क्रांतिवीरांनी ब्रिटीशांशी लढून आपल्याला स्वातंत्र्य मिळवून दिले.
देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी भारतातील हजारो शूरविरांनी अथक संघर्ष करावा लागला होता.
गूंज रहा है दुनिया में भारत का नगाड़ा, 
चमक रहा आसमान में देश का सितारा, 
आजादी के दिन आओ मिलकर करें दुआ,
 बुलंदी पर लहराता रहे तिरंगा हमारा।
देशातील हजारो शूर वीरांनी देशासाठी प्राणांची आहुती दिली . या अन्यायाच्या व अत्याचाराच्या विरोधात लोकमान्य टिळक ,महात्मा गांधी ,पंडित जवाहलाल नेहरू ,भगतसिंग ,चंद्रशेखर आजाद ,सरदार वल्लभभाई पटेल ,वीर सावरकर ,डॉ. बाबासाहेब आंबेडकर अशा अनेक शूर वीरांनी आपल्या प्राणाचे बलिदान दिले . मंगल पांडे , सुभाष चंद्र बोस , राजगुरू ,सुखदेव , लाला लजपतराय , झाशी ची राणी लक्ष्मीबाई व अनके महिला क्रांतिकारक अश्या हजारो शूर वीरांनी , क्रांतीकारांनी देशासाठी खूप मोठे योगदान आहे. आणि अखेर 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत देश स्वतंत्र झाला.

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत असताना आज देशापुढे असलेल्या ज्वलंत समस्यांचा विचारपूर्वक आढावा घेऊन एक वैचारिक सिंहावलोकन होणे गरजेचे आहे. आज देशापुढे असलेल्या सामाजिक संरक्षण विषयक समस्या अतिशय भेदकपणे भारत राष्ट्राला पोखरत आहेत. प्रांतभेद, जातिभेद, लिंगभेद, भाषाभेद, सामाजिक असमता,आर्थिक असमता, दहशतवाद यांनी भारत देश मेटाकुटीला आला आहे.सर्वसामान्य माणसाच्या मानगुटीवर बसलेलं दारिद्र्य पाहिलं की भारत मातेच्या डोळ्यातून किती दुःखाचे अश्रू दररोज वाहत असतील याची कल्पना येते.

1947 ला देश स्वतंत्र झाला आणि 2047 ला भारत जगामध्ये एक महासत्ता म्हणून निर्माण वाहे आज आपण स्वप्न जरुर पाहत आहोत परंतु देशभक्तांनी पाहिलेली स्वप्ने काय होती याचा आपल्याला विसर पडला नाही ना? असा प्रश्न आज माझ्या मनात निर्माण होतो. कारण आर्थिक दृष्ट्या आणि संरक्षण दृष्ट्या भारत बलवान जरी झाला तरी सर्वसामान्य भारतीय नागरिकाचे जीवनमान कितपत उंचावले आहे? हा फरक खरं विचार करण्यासारखा प्रश्न आहे.

ए मेरे वतन के लोगो जरा आंखो मे भरलो पानी

जो शहीद हुए है उनकी जरा याद करो कुर्बानी”

असे नम्रतापूर्वक प्रत्येक भारतीयाला सांगून आपल्या भारतातील सामान्यातील सामान्य देशबांधवांना स्वातंत्र्याचे फळे मिळाली पाहिजेत.यासाठी तन-मन-धनाने प्रयत्न करावेत. यासाठी प्रेरणा निर्माण होतो आणि यासाठी त्यांना मी शुभेच्छा देतो. भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने हा

“आचंद्र सूर्य नांदो स्वातंत्र्य भारताचे,

आचंद्र सूर्य नांदो स्वातंत्र्य भारताचे” असे म्हणून थांबतो.

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निबंध मराठी 2022 PDF

या संपूर्ण सोहळ्याचे थेट प्रक्षेपण दिल्लीवरुन टेलिविजन व रेडिओवर करण्यात येते . संपूर्ण देशातील शाळा, महाविद्यालय ,खाजगी आणि सरकारी कार्यालयांमध्ये राष्ट्रीय ध्वज फडकविला जातो . या दिवशी शाळा आणि महाविद्यालयांमध्ये निबंध, भाषण, गायन अशा विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात येते . स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थ्यांना तसेच गुणवंत विद्यार्थ्यांना बक्षिसे देण्यात येतात.

विद्यार्थ्यांना खाऊ दिला जातो आणि त्यानंतर सुट्टी दिली जाते . संपूर्ण देशभरात आनंदाचे वातावरण असते . अशाप्रकारे स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात संपूर्ण देशभरात साजरा केला जातो. आज सर्व शहरात ,तालुक्यात ,गावात ध्वजारोहण केले जाते रा. ष्ट्रगीत गायले जाते . भारतात सर्वत्र भाषणे , प्रभातफेरी यांचे आयोजन केले जाते.

आपण सर्वजण खूप नशीबवान आहोत की स्वतंत्र अशा भारत देशामध्ये आपला जन्म झाला आहे. त्या शूर वीरांच्या बलिदानामुळेच आपण आज शांत आणि सुंदर आयुष्य जगू शकत आहोत . आजचा हा सुवर्णकाळ आपण इथे आनंदाने उत्साहाने साजरा करत आहोत . कारण आपल्या देशाचे वीर जवान तिकडे सीमेवरती स्वतःचा जीव धोक्यात घालून शत्रूशी सामना करत आहेत.

या सैनिकांना माझा सलाम . आज आपला भारत देश आणि शिक्षण, विज्ञान-तंत्रज्ञान ,खेळ, व्यापार अशा अनेक क्षेत्रात मोलाचे काम करत आहे. दिवसेंदिवस देश प्रगतीपथावर जात आहे . परंतु समाजात गुन्हेगारी ,भ्रष्टाचार ,गरिबी आणि अस्वच्छता यांचे प्रमाण वाढत आहे . भारताचे एक नागरिक म्हणून देशाच्या विकासासाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत.

वाईट लोकांपासून आणि वाईट गोष्टी पासून आपल्या देशाचे संरक्षण केले पाहिजे. सर्वांनी एकत्र येऊन एकजुटीने काम करून भारत देश जगातील सर्वोत्कृष्ट देश बनवणे हे आपले कर्तव्य आहे.

” स्वातंत्र्याच्या जल्लोषाचा,
महिमा हा आगळा…
अमृत महोत्सवी वर्षात
साजरा करू उन्नतीचा सोहळा स्वातंत्र्याचे जतन कराया,
त्यागाचा मार्ग धरू वेगळा !!”

जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत

You can download Swatantryacha Amrut Mahotsav Nibandh in Marathi PDF by going through the following download button.


स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निबंध मराठी PDF Download Link

Report a Violation
If the download link of Gujarat Manav Garima Yojana List 2022 PDF is not working or you feel any other problem with it, please Leave a Comment / Feedback. If स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निबंध मराठी is a copyright, illigal or abusive material Report a Violation. We will not be providing its PDF or any source for downloading at any cost.

Leave a Reply

Your email address will not be published.